
Song - Kenva Tari Pahate Movie - Nivdung Lyrics - Suresh Bhat Music - Pt. Hridaynath Mangeshkar Singer - Padmaja Phenani Actress - Archana Joglekar गीत - केंव्हा तरी पहाटे चित्रपट - निवडुंग गीतकार - सुरेश भट संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर गायक - पद्मजा फेनानी कलाकार - अर्चना जोगळेकर गीत - केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली मिटले चुकून डोळे, हरवून रात गेली सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे उसवून श्वास माझा, फसवून रात गेली कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा, निसटून रात गेली उरले उरात काही, आवाज चांदण्यांचे आकाश तारकांचे, उचलून रात गेली स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीत पंक्ती मग ओळ शेवटाची, सुचवून रात गेली
Marathi
Movie
Nivdung
Suresh
Bhat
Hridayanath
Mangeshkar
Asha
Bhosle
Padmaja
Phenani
Archana
Joglekar